Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


ऑनलाईन पासपोर्ट

 _*ऑनलाईन पासपोर्ट कसा काढायचा?*_

_*Letsup.in I Useful Info*_

तुम्हाला जर पासपोर्ट काढायचा असेल तर आता पासपोर्ट कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहिलेली नाही. कारण आता घरी बसल्या तुम्ही ऑनलाईनही पासपोर्ट काढू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल व काय आहे याची प्रोसेस जाणून घेऊयात...

 _*स्टेप- 1*_

* ऑनलाईन पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला http://passportindia.gov.in/AppOnlineProject/online/procEFormSubया संकेतस्थळावर जावे . तेथे प्रथम दिलेली सर्व माहिती भरून रजिस्टर करावे .

 _*स्टेप- 2*_

* तुमचा लॉग-इन आयडी तयार होईल. तो तयार करून नवीन पासपोर्ट काढण्यासाठीच्या लिंकवर (अप्लाय फॉर न्यू पासपोर्ट) क्लिक करा. 

* जर तुम्ही पूर्वी पासपोर्ट काढला असेल तर (री-इश्यू ऑफ पासपोर्ट) या लिंकवर क्लिक करा.

* दिलेल्या अर्जामध्ये आवश्यकता असेली माहिती भरा आणि अर्ज ‘सबमिट’ करा.

* त्यानंतर पे अ‍ॅण्ड शेडय़ूल अपॉइंटमेंटवर क्लिक करा. त्यावर व्हिव्ह सेव्ह्ड/ सबमिटेड अ‍ॅप्लिकेशनवर क्लिक करा.

 _*स्टेप- 3*_

* तुम्ही क्रेडिट अथवा डेबिट कार्डने ऑनलाईन पेमेंट करू शकता. इंटरनेट बँकिंगद्वारेही तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता.

 _*स्टेप- 4*_

* प्रिंट अ‍ॅप्लिकेशन रिसिप्ट या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अ‍ॅप्लिकेशन रेफरन्स क्रमांक असलेली पावती छापून येईल.

* पासपोर्ट कार्यालयाला तुम्ही आवश्यक कागदपत्रे आणि वरील नमूद केलेल्या पावतीसह ठरलेल्या दिवशी आणि वेळी भेटू शकता.


_*ई-फॉर्म भरून देखील काढू शकता पासपोर्ट*_

ऑनलाईन फॉर्म डाऊनलोड करुन डिटेल्स भरुन तो अपलोड करता येतो. अशा प्रकारेही पासपोर्ट काढता येऊ शकतो.

यासाठी तुम्हाला पासपोर्ट सेवा ऑनलाईन पोर्टल वरुन फॉर्म्स अॅण्ड अॅफिडेव्हिट सेक्शनमध्ये जाऊन डाऊनलोड ईफॉर्मवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर फॉर्म डाऊनलोड होईल.

फॉर्म फिल केल्यावर व्हॅलिडिटी अॅण्ड सेव्ह बटण क्लिक करा. त्यानंतर एसएमएल फाईल जनरेट होईल. फॉर्मला याच फॉर्मेटमध्ये अपलोड करावे लागेल.

त्यानंतर पासपोर्ट सेवा पोर्टलवर लॉगइन करा. अपलोड ई-फॉर्मवर क्लिक करुन अपलोड करा.

त्यानंतर पे अॅण्ड शिड्यूल अपॉईंटमेंटवर क्लिक करा. अपॉईंटमेंट बुक करा. पेमेंट करा.

ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन जनरेट केल्यावर 90 दिवसांच्या आत तुम्हाला पासपोर्ट कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
पुढील माहिती तुम्हाला पासपोर्ट कार्यालयात मिळेल.

_*पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रे*_

पासपोर्ट साइज फोटोग्राफ

4 प्रती रेशनकार्ड (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड)

निवडणूक कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड)

जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी अटेस्टेड) 

लग्न झाले असल्यास महिलांच्या बाबतीत मॅरेज सर्टिफिकेट आणि जर लग्नात नाव बदलले असल्यास पासपोर्टच्या अर्जात दिलेल्याप्रमाणे अ‍ॅफिडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) करून घ्यावे.
Tricks and Tips Tricks and Tips