सायना नेहवाल (जन्म - १७ मार्च १९९०,हिस्सार, हरयाणा) ही एक भारतीयबॅडमिंटनपटू आहे. ऑलिंपिक खेळातउपांत्यपूर्व फेरी गाठणारी तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला आहे. जून २००९ मध्ये झालेल्या इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीचभारतीय महिला खेळाडू आहे.[१]
जुलै ३०, २०१० रोजी सायनाला २००९-१० मधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारमिळाल्याचे जाहीर करण्यात आले.[२] मार्च २०१२ मध्ये साईनाने स्वीस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतरजून २०१२ मध्ये थायलंड ओपन ग्रां प्री सुवर्णसन्मान पटकावला.[३] २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये तिने कांस्य पदकजिंकले आहे. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
कारकीर्द
२००६ मध्ये सायना १९ वर्षांखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू झाली.