e लॉकर
येथे क्लिक करा
e लॉकर
आपली सगळी कागदपत्रं समजा सरकारकडेच ठेवायला दिली आणि कुठलाही फॉर्म भरताना
सांगितलं की, पाहून घ्या तुमचे तुम्ही. तर? असं होऊ शकतं?
महत्त्वाची कागदपत्रं शासनाच्याच ताब्यात फुकट ठेवण्याची सोय!
‘डिजिटल इंडिया’ हा शब्द सध्या सतत कानावर पडतो आहे. जिकडे तिकडे लाइफ डिजिटल होण्याच्या चर्चा आहेत. त्या सा:याला शासनही प्रोत्साहन देत आहे. त्यातल्याच अनेक महत्त्वाकांक्षी योजनांमधील एक योजना म्हणजे ‘डिजिलॉकर!’
शासनाला सध्याच्या किचकट, वेळखाऊ पद्धती बाद करत ई-गव्हर्नन्सकडे वाटचाल करायची आहे. साडेसहा कोटी ब्रॉडबॅण्ड आणि तब्बल 91 कोटी मोबाइल वापरणा-यांच्या देशात इंटरनेटचा वापर आता महत्त्वाचा ठरणार आहे. त्याद्वारेच शासनाच्या सोयी-सुविधा सामान्य माणसांर्पयत पोचवण्यासाठी आता शासन धडपडतं आहे. याच उद्देशाचा एक भाग म्हणून भारत सरकारने काही दिवसांपूर्वीच ‘डिजिलॉकर’ या नवीन सेवेचा शुभारंभ केला आहे. तरुण मुलांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जास्तीत जास्त तिचा वापर करू शकलो तर आपलंच काम सुकर आणि सुरळीत व्हायला मदत होईल. अमुकतमुक कागद नाही म्हणून कुणी आपल्याला खेटे मारायला लावणार नाही.
म्हणून हे लॉकर आणि त्याची किल्ली तुमच्याकडे हवीच!
काय आहे डिजिलॉकर?
डिजिलॉकर ही एक वेबसाइट आहे. या वेबसाइटवर तुमचे महत्त्वाचे दस्तावेज, कागदपत्रं ठेवायची मोफत सोय भारत सरकारने केली आहे.
होतं काय की, शिक्षण-नोकरी यासाठी आपली महत्त्वाची कागदपत्रं सांभाळून ठेवावीच लागतात. कुठलाही नवीन अर्ज भरताना पळापळ करून ती नीट जमवावी लागतात. त्यासाठी अनेक दाखले जोडावे लागतात. पासपोर्ट, पॅन कार्ड यांची ङोरॉक्स कॉपी काढा, त्यावर साक्षांकन करा अशा एक नाही अनेक कटकटी असतात. पण ऑनलाइनच्या या जगात डिजिलॉकरची सुविधा या सर्व कटकटींवरचा रामबाण उपाय ठरू शकते. आपली सगळी कागदपत्रं एकदाच सुरक्षित ठिकाणी डिजिटल रूपात आपण ठेवू शकतो.
महत्त्वाची कागदपत्रं स्टोअर करा
* डिजिलॉकर वापरण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक लागेल.
* https :/ digitallocker.gov.in या वेबसाइटवर तुम्ही तुमचा आधार कार्ड आणि तुमच्या मोबाइलवर आलेला OTP(one time passsword)वापरून लॉगीन करू शकता.
* तुमची सर्व महत्त्वाची कागदपत्रं, प्रमाणपत्रं यांच्या स्कॅन केलेल्या प्रती त्या वेबसाइटवर अपलोड करायच्या.
* महत्त्वाची सर्टिफिकेट्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, इन्कम टॅक्स र्टिन्स, इतर अनेक महत्त्वाची कागदपत्रं तुम्ही डिजिलॉकरवर स्टोअर करू शकता.
* या सगळ्यांसाठी सध्या 10 एमबी इतकी स्टोरेज स्पेस मिळेल. भविष्यात ती एक जीबीपर्यंत वाढवायची शासनाची योजना आहे.
डिजिलॉकरचा उपयोग काय? * या लॉकरमधे कागदपत्रं ठेवली की त्या प्रत्येक महत्त्वाच्या दस्तावेजासाठी तुम्हाला एक लिंक मिळेल. आताच आपण बरेच फॉर्म्स ऑनलाइन भरतो. हळूहळू या फॉर्म्समध्ये तुमच्या दस्तावेजासाठी स्कॅन प्रतीऐवजी फक्त ही लिंक पेस्ट केली की त्या त्या संस्थेला किंवा शासकीय कार्यालयाला तुमच्या दस्तावेजाचा अॅक्सेस मिळेल.
* डिजिलॉकरमध्ये वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांनी जारी केलेल्या दस्तावेजांची एक यादी असेल. त्यामुळे आपल्या कामासाठी काय कागद लागतील, हे कळेल. कुणी आपली अडवणूक करू शकणार नाही.
* याशिवाय वेगवेगळे फॉर्म्स भरताना कोणकोणत्या शासकीय कार्यालयांना तुम्ही तुमच्या दस्तावेजांचा अॅक्सेस दिला आहे याची यादीदेखील बघता येईल.
* डिजिलॉकरमधली आणखी एक महत्त्वाची सोय म्हणजे ई-साईनिंग - डिजिटल सिग्नेचर. ऑनलाइन फॉर्म्स भरताना तुमचे डिजिटल सिग्नेचर ब-याच फॉर्म्सवर आवश्यक असते. सध्या ई-साईनिंगची पद्धत किचकट आहे, कारण त्यात तुम्हाला इश्यू केलेला एक यूएसबी डॉंगल जोडल्याशिवाय ई-साईन करता येत नाही. म्हणजे हे डॉंगल सांभाळायची कटकट आलीच. डिजिलॉकरमध्ये ई-साईनिंगसाठी असे डॉगल वापरायची गरज उरणार नाही.
हे लॉकर सेफ आहे का?
* डिजिलॉकर भारत सरकारची सुविधा असल्यामुळे गुगल ड्राइव्ह, मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह किंवा ड्रॉपबॉक्स यासारख्या खासगी आणि परदेशी सेवांपेक्षा नक्कीच अधिक विश्वसनीय आहे.
* याशिवाय मोदी सरकारची ही गाजावाजा करून सुरू केलेली योजना असल्याने ती अधिकाधिक सुरक्षित, सुलभ आणि उपयुक्त करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
* ही योजना सुरू झाल्यापासून काही दिवसातच जवळपास सव्वापाच लाख नागरिकांनी या डिजिलॉकरवर रजिस्ट्रेशन केले आहे. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे.
* डिजिटल होत असलेल्या या देशात ही नवीन घडामोड आपल्याला माहितीच पाहिजे, त्यामुळे तरी आपली कागदपत्रं एका जागी राहू शकतील!
🌏जनहितार्थ 🌏