शब्दातील वास्तविकता
पहिली त्याला जन्म देते,
दुसरी जन्मात त्याला भेटते,
तिसरी त्याच्याकडे जन्म घेते.
पहिली त्याच्यासाठी जीवाचं रान करते,
दुसरी त्याला जीव लावते,
तिसरी त्याला जीव लावायला शिकवते.
पहिलीचा तो प्राण असतो,
दुसरीला तो प्रिय असतो,
तिसरी त्याला प्राणाहून प्रिय असते.
पहिली त्याला संस्कार देते,
दुसरी प्रेम देते,
तिसरी सुख देते.
त्याला ठेच लागताच पहिलीचे नाव त्याच्या तोंडात येते, दुसरीच्या डोळ्यात पाणी येते,
तिसरी त्यावर फुंकर घालते.
पहिलीचा तो 'बाळ' असतो,
दुसरीचा 'नवरा' असतो,
तिसरीचा तो 'बाप' असतो
तरीही 'स्त्री भ्रूणहत्येला' तो कसा तयार होतो....?
संकलित