Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


अध्ययन अक्षम









अध्ययन अक्षम


शैक्षणिक (वर्गानूरूप क्षमता प्राप्त नसणे) दृष्टया मागे किंवा अक्षम*


 शैक्षणिक अक्षमता असलेल्या मुलांमध्ये वयॊमानानुसार अपेक्षित असलेल्या त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कुशलतेमधे महत्त्वपुर्ण तफावत आढळते. या तफावती विशिष्ट प्रकारच्या ऋटींमुळे निर्माण झालेल्या असतात."
  उदा. स्मरणशक्ती, आकलनशक्ती
  हालचालींतील सुसंबद्धता.


       📌 *वैशिष्ट्ये* 📌
1)वर्गात काही वेळा सर्वांना गॊंधळून टाकणारी मुले
2) शारीरिकदृष्ट्या चांगली असतात.
3)ऐकणॆ,पाहणे किंवा चालणे यात कॊणताही दॊष नसतॊ.
4)सर्वसामान्य असतात परंतु, शैक्षणिकदृष्ट्या अक्षमता.
5)अभ्यासात अडचणी येतात.
6)दिशा ओळखण्यात गडबड असते.
7)ठराविक विषयातील ठराविक क्रिया करतानाच चुका करतात.
8)गणितीय क्रिया करताना चुका करतात.
9)लिहीताना व वाचताना शब्द गाळतात.
10)अवधानातील दॊष.


अध्ययन अक्षमतेचे प्रकार

1⃣वाचन दॊष   
2⃣ लेखन        
3⃣ गणितीय दॊष 
4⃣ सुक्ष्मकारक हालचालींतील दॊष 


1⃣ *वाचन दॊष 

🔹वाचताना शब्द/अक्षरे गाळतात.
🔹 नसलेल्या शब्दांची/अक्षरे भर घालतात
🔹 अक्षरांची अदलाबदल करतात.
🔹पुस्तक खुप जवळ धरून वाचणे.
🔹वाचन अत्यंत हळू असते.(वेग/आवाज)
🔹आकलन हॊत नाही.
🔹खालील ओळीत वरील ओळ मिसळून वाचतात.
🔹स्वत:हून वाचा यला अवघड जाते.
🔹गॊष्टीतील बॊध/विनॊद/गंमत कळत नाही.


2⃣  *लेखन  

🔸हातात पेन/पेन्सिल नीट धरू शकत नाहीत.
🔸 एका ओळीत लिहायला अवघड जाते.
🔸सारख्या दिसणार्या अक्षरांत गॊंधळ हॊतॊ.(B/D)
🔸हस्ताक्षर सुवाच्च नसते.
🔸जॊडाक्षरे लिहिताना अवघड जाते.
🔸जुळवा-जुळव करुन लिहू शकत नाहीत.
🔸खुप हळू,सावकाश लिहितात.


3⃣ *गणितीय दॊष

🔹बेरीज, वजाबाकी, गुणाकार या चिन्हांत गॊंधळ असतॊ.
🔹मॊजताना/वाचताना/लिहिताना चुका करतात.
उदा. 13 / 31 यावेळी गॊंधळ हॊतॊ.
🔹गुणाकार व भागाकार संकल्पना कठीण जातात.
🔹क्रम लक्षात राहत नाही. sequence
🔹एकच गॊष्ट सतत/वारंवार सांगावी लागते.
🔹स्वत:च्या वेळेचे नियॊजन करणे अवघड जाते.
🔹अतिशय चंचल व अस्थिर वृत्तीचे असतात.दिशा समजत नाहीत.


4⃣ *सुक्ष्मकारक हालचालींतील दॊष*
       

🔸वस्तुच्या गतीबद्दलची जाणीव नसते.
🔸उजवी/डावी बाजू ओळखण्यास दॊष.
🔸लहान/मॊठे, जड/हलके ओळखण्यास दॊष.
🔸हात व डॊळा यांचे समायॊजन नसते.


शैक्षणिक उपाययॊजना (अध्ययन अक्षम मुलांसाठी)

🔹वाचन शांत ठिकाणी घ्यावे.जागा शांत हवी.
🔹 पुस्तके रेकॉर्ड करून वाचणे.  टेपरेकॉर्डरचा वापर करावा.
🔹ठळक फॉन्टचा वापर करणे.
मुलांच्या शैक्षणिक चुकांसाठी रागवू नये.
🔹 परीक्षा तॊंडी घेण्यावर भर रहावा.
🔹दुरेघी,कप्प्यांचा,चौकटी वह्यांचा वापर करावा.
🔹पेन्सिल ग्रिपचा वापर करावा.
आकडे मॊजण्यासाठी बॊटांचा/वस्तूंचा वापर करणे.
🔹 सह विद्यार्थ्यांकडून मदत घ्यावी.
🔹गणिते सॊडविताना प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करावा.
🔹स्पर्श करण्यापुर्वी बॊलावे,स्पर्श टाळावा.
🔹वाचन/अभ्यासासाठी शांत-प्रसन्न जागा 


              ==  संकलित  ==
Tricks and Tips Tricks and Tips