Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


अॅन्ड्रॉईड चे अंतरंग




अॅन्ड्रॉईड चे अंतरंग 

*📱फोन संभाषण (Telephonic features) –*


 ```अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम voice call, video call, conference call इत्यादी संभाषण सुविधा पुरवते.```


*📱मेसेजिंग (messaging)*– 


```अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम SMS (Short Messaging Service) आणि MMS (Multimedia Messaging Service) दोन्हीला सपोर्ट करते.```


*📱इंटरनेट कनेक्टीव्हीटी (Internet connectivity)* – 


```अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम वाय-फाय द्वारे इंटरनेट कनेक्शन वापरू शकते. शिवाय, आपण आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडरला (Idea, Airtel, BSNL etc.) सांगून आपल्या सीम कार्ड द्वारे डेटा कनेक्शन प्लॅन अॅक्टिवेट करू शकतो, ज्या द्वारे आपल्याला 3G अथवा 4G सर्व्हिस अॅन्ड्रॉईड  मध्ये वापरता येते. (3G चा स्पीड कमी असतो, पण 4G चा स्पीड जास्त असला तरी त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते हे लक्षात घेऊन जेथे इंटरनेट स्पीड खूप जास्त गरजेचा आहे तेथेच 4G वापरणे कधीही सोयीस्कर ठरते.)```


*📱अॅप्स (APPs) –*


```स्मार्टफोनवर वापरल्या जाणा-या प्रोग्रॅम्सना अॅप्स म्हणतात. अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आपण अनेक उपयुक्त अॅप्स गुगलच्या गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करू शकतो, आणि वापरू शकतो. यामध्ये अनेक वर्तमानपत्रे, social networking APPs, गेम्स, इत्यादींचा समावेश होतो. यापैकी काही अॅप्स हे पूर्णपणे फुकट असतात, तर काहींना पैसे पडतात.```


*📱मल्टी टास्कींग (Multitasking) –*


```अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम एकाच वेळेला अनेक अॅप्स वापरण्याची सोय देते. यापैकी एक अॅप हे स्क्रीनवर असते, तर बाकीचे लपलेले (hidden) असतात, ज्यांना ग्राहक एका पूर्वनियोजित कृतीने कधीही पाहू शकतो, आणि ते पुढे चालू ठेवू शकतो.```


*📱गुगल सर्च (Voice based Google search facility)*– 


```अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आपण बोलून सुद्धा अनेक गोष्टी शोधू शकतो. उदाहरणार्थ, “शनिवार वाडा” असं बोलल्यास अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम आपल्याला शनिवार वाडा असलेलं ठिकाण, त्याची माहिती, तेथपर्यंत जाण्याचा रस्ता, जायला लागणारा वेळ, इत्यादी सर्व माहिती पुरवते.```


*📱गुगल नेव्हिगेशन (Google navigation)*–


``` यामध्ये आपण दोन ठिकाणांना जोडणारे रस्ते शोधणे, त्यांमधील अंतर शोधणे, जवळची सार्वजनिक ठिकाणे (बस थांबा, खानावळ, शाळा) शोधणे, आपण आत्ता कुठे आहोत हे GPS (Global Positioning System) च्या सहायाने बघणे इत्यादी सुविधा आपल्याला वापरता येतात.```


*📱गुगल कॅलेंडर (Google calendar)*– 


```यामध्ये आपण आपले इव्हेंट्स, सुट्ट्यांचे दिवस, वाढदिवस इत्यादी पाहू शकतो, आणि त्यांचे रीमाईन्डर्स लावू शकतो.```


```☝🏽एकाच गुगल अकाऊंटने सगळं काही (One Google account for all) – अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम ग्राहकाचा एक गुगल अकाऊंट घेते, आणि तोच एक अकाऊंट गुगलच्या विविध सर्व्हिसेस करता वापरते. 


👉🏽उदाहरणार्थ, Google mail (ज्यामध्ये आपले ई-मेल्स व फोन कॉन्टॅक्टस् साठवले जातात), Google Maps (ज्यामध्ये आपण आपली घर व कचेरीची ठिकाणे साठवू शकतो, व वेळेला त्याचा उपयोग नेव्हिगेशन करता करू शकतो),


👉🏽 Google Keep (ज्यामध्ये नोट्स साठवल्या जातात),


👉🏽 Google Play (जेथून अॅप्स डाऊनलोड केले जातात),

 👉🏽Google Drive (आपल्या फाईल्स करता ऑनलाईन स्टोअर) इत्यादी. 

💻एक अजून चांगली सुविधा म्हणजे, आपल्या स्मार्टफोनवर वापरलेल्या अकाऊंटद्वारे ही माहिती गुगल सर्व्हर वर साठवली जाते, जी आपण आपल्या डेस्कटॉप / लॅपटॉप वर सुद्धा कधीही वापरू शकतो, अगदी आपला स्मार्टफोन जवळ नसतांना सुद्धा आपले सगळे ई-मेल्स, फोन कॉन्टॅक्टस् इत्यादी  सर्व आपल्याला सहज मिळते.


 📱वापरातील सुलभता (Accessibility) – 


````कमी अथवा न ऐकू येणा-या, कमी अथवा काहीच न दिसणा-या व्यक्तींकरता अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम काही सुलभ सुविधा देते. यामध्ये स्क्रीनवर बोट टेकवल्यास आपण काय क्रिया करणार आहोत, याची आगाऊ सूचना देणे, केलेली क्रिया ग्राहकाला ऐकवणे, स्क्रीन वरील अक्षरे मोठी दाखवणे, स्क्रीनचा प्रकाश वाढवणे इत्यादी  सुविधा येतात.```


*📱फाईल्स हस्तांतरण (Files transfer between devices)*– 


```अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे आपण Bluetooth connectivity सुविधा वापरून आपल्या स्मार्टफोनमधील फाईल्स दुस-या डिव्हाईसवर (संगणक, मोबाईल, स्मार्टफोन, टॅबलेट इत्यादी) ट्रान्सफर करू शकतो. शिवाय, दुस-या डिव्हाईसवरील फाईल्स आपल्या स्मार्टफोन वर आणू शकतो. यासाठी आपला व समोरचा डिव्हाईस Bluetooth supported असणं गरजेचं आहे.````



📱मल्टिमिडीया(Multimedia support–


```अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिममधील गॅलरी, कॅमेरा, म्युझिक प्लेअर, साऊंड रेकॉर्डर, व्हिडीओ प्लेअर अशी अनेक अॅप्स आपल्याला  फोटो, गाणी, व्हिडीओ यांचा मनमुराद आनंद देतात.


*📱फोन सुरक्षितता (Phone security features)*


– अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिम आपल्याला फोन लॉकिंग करता विविध पर्याय देते. यात प्रामुख्याने पॅटर्न लॉक (यामध्ये ठराविक पद्धतीने बिंदू जोडत गेल्यास स्क्रीन अनलॉक होतो), पिन / पासवर्ड लॉक (यामध्ये ठराविक key combination टाईप केल्यास स्क्रीन अनलॉक होतो), व्हॉईस लॉक (यामध्ये ठराविक व्यक्ती ठराविक शब्द बोलल्यास स्क्रीन अनलॉक होतो), फेस लॉक (यामध्ये ठराविक व्यक्तीचा चेहरा स्मार्टफोनच्या समोर धरल्यास अथवा ठराविक व्यक्तीच्या चेह-याने ठराविक क्रिया केल्यास, उदाहरणार्थ डोळे मिचकावणे, स्क्रीन अनलॉक होतो).


*याशिवाय अॅन्ड्रॉईड  ऑपरेटिंग सिस्टिममध्ये घातलेले काही अॅप्सही आपल्यासाठी सुरक्षिततेची व्यवस्था करतात. क्विक हील अॅन्टिव्हायरस ठराविक फोन नंबर्स वरून येणारे फोन्स अथवा संदेश ब्लॉक करतं, अॅपलॉक हे अॅप एक पूर्वनियोजित पासवर्ड टाकल्याखेरीज आपल्याला बाकीचे कुठलेही अॅप्स वापरू देत नाही.



                                          ==  संकलित  ==
        
Tricks and Tips Tricks and Tips