Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


स्वच्छतेविषयी घोषवाक्ये










स्वच्छतेविषयी घोषवाक्ये


1) गाडगेबाबांचा एकच मंत्रस्वच्छतेचे जाणा तंत्र.
2) स्वच्छता आली अंगणातसमाज का अंधारात.
3) सुरक्षित साधन पाण्याचे , महत्व पटवा हातपंपाचे.
4) हगवण , अतिसार रोगाचा प्रसार ,हे तर दूषित पाण्याचेप्रहार.
5) उघड्यावर शौचास बासु नकारोगांना आमंत्रण देऊनका.
6) पाणी म्हणजे जीवनहेच आपले स्पंदन.
7) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरुआरोग्य आपले निरोगीबनवू.
8) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवाडासांची अंडी पळवुनलावा.
9) पिण्यासाठी हवे शुध्द पाणीनाहीतर होईल आरोग्याचीहानी.
10) नका बसु उघड्यावर संडासाला ,संधि मिळेल रोगाराईपसरण्याला.
11) सांडपाण्याची योग्य विल्हेवाटगावात येईलआरोग्याची पहाट.
12) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे , दूषित करू नकातुमच्या हाताने.
13) स्वच्छता  शुद्ध पाणी हे आहे तंत्र , ग्रामिणआरोग्याचा हाच कानमंत्र.
14) ज्याचे घरी सदैव स्वच्छतानांदेल तेथे आरोग्य सुबता.
15) रंग भगवा त्यागाचामार्ग स्विकारू स्वच्छतेचा.
16) पाणी शुद्धिकरण नियमित करूसर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू.
17) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ूसर्व रोगराईनादूर पळवू .
18) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृतीदेईल सामाजिकआरोग्याला गती.
19) " स्वच्छतामाणसाचे आत्मदर्शन घडविते.
20) वैयक्तिक स्वच्छतेची महतीरोगापासुन मिळेल मुक्ति.
21) हातात मोबाईल घरात फोन , उघड्यावर शौचालाबसलयं कोण.
22) जेवणापूर्वी धुवा हातजेवणानंतर धुवा दात.
23) नखे कापा बोटाची  , नाही होणार व्याधि पोटाची.
24) असेल दृष्टी , तर दिसेल स्वच्छ सृष्टि.
25) संडास बांधा घरोघरी , आरोग्य नांदेल त्याच्या दारी.
26) सांडपाण्याला आळा  , रोगाराई टाळा.
27) स्वच्छ सुंदर परिसर ,  जीवन निरोगी निरंतर.
28)  स्वच्छ शाळा करा हातांनी , सुंदर गाणी गाऊ मुखांनी.
29) स्वच्छ सुंदर परिसरातुच , सुंदर सुसंस्कृत नागरिकघडतात.
30) गावकरी मिळुन एक काम करूशौचालयाचा वापरकरू.
31) शौचालय असेल जेथे , खरी प्रतिष्ठा येईल तेथे.
32) संडास बांधण्या नाही म्हणू नयेशौचाला लोटा घेऊनजाऊ नये.
33) आधी केले मग सांगितले , आधी आपल्या घरीशौचालय बांधले.
34) स्वच्छ घर , सुंदर परिसर , शोचखड्याचा करुयावापर.
35) कचरा कुंडिचा वापर करू , सुंदर परिसर निर्माण करू


       🌏संकलित 🌏
Tricks and Tips Tricks and Tips
.
r
e
h
c
a
e
T
o
n
h
c
e
T
.
e
l
a
s
u
k
n
o
S
h
s
e
l
m
a
K