रजेचे प्रकार
1)*नैमित्तिक रजा
2)* विशेष नैमित्तिक रजा
3)* अर्धपगारी रजा
4)*शिक्षकांसाठी आर्थिक रजा(दीर्घकालीन मुदतीची रजा.
🌀 *5)*असाधारण रजा.
🌀 *6)* प्रसुती रजा.
🌀 *7)*मोठ्या सुटीऐवजी अर्जित रजा.
🌀 *8)*प्रत्याप्रित रजा( परतफेड).
🌀 *9)*आजारपणासाठी रजा.
आज आपण *अर्जित रजा*
याबाबत अधिक माहीत जाणून घेऊ.
*अर्धवेतनी रजेऐवजी " अर्जित रजा " मंजूर करण्यात येते. त्याबाबत नियम...*
🌀 *1)* खाजगी शाळेतील दीर्घ सुटी विभागात काम करणाऱ्या मुख्याध्यापक उप मुख्याध्यापक शिक्षक प्रयोग शाळा सहाय्यक प्रयोग शाळा परिचर यांना 20 दिवसांच्या अर्धपगारी रजेऐवजी 10 दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात यावी.
💠 *2)* अर्जित रजा शिक्षक/कर्मचारी यांच्या खाती प्रत्येक सहामाही प्रमाणे जानेवारी व जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येकी 5 अशा दोन हप्त्यामधे आगाऊ जमा करण्यात याव्यात.
💠 *3)* शिक्षक/कर्मचा-याने अर्ध वर्षामध्ये असाधारण रजा घेतली असेल किंवा त्यांच्या गैरहजेरीचा कालावधी अकार्यदिन समजण्यात आला असेल तर पुढील अर्ध वर्षाच्या सुरवातीला रजा खात्यातील
असाधारण रजा अकार्यदिन कालावधीच्या 1/30 याप्रमाणे कमी करण्यात यावी. परंतु कमी करण्यात येणाऱ्या रजेचा कमाल कालावधी 5 दिवस इतकाच असावा.
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
💠 *4)* अर्ध वर्षामधे नियुक्ती झालेल्या किंवा सेवा समाप्त करण्यात आलेल्या शिक्षक/ कर्मचा-याला त्या शिक्षक/ कर्मचारी जेवढे महिने सेवा करण्याची शक्यता असेल त्या प्रत्येक पुर्ण कॅलेंडर महिन्यासाठी आणि सेवा समाप्तीच्या दिनांकापर्यंत प्रत्येक पुर्ण कॅलेंडर महिन्यात 1/6 दिवस या प्रमाणात अर्जित रजा मंजूर करण्यात यावी.
💠 *5)* दिनांक 4 ऑगस्ट 1995 चा आदेश दिनांक 1 जुलै 1995 पासून अमलात येईल. म्हणजेच या आगोदरच्या म्हणजे 30 जुन 1995 पर्यंत शिक्षक/कर्मचा-याच्या खाती प्रचलित पध्दतीने अर्धवेतनी रजा जमा करण्यात यावी.दिनांक 1 जुलै 1995 नंतर त्याला अर्धवेतनी रजा अनुज्ञेय राहणार नाही.
💠 *6)* 30 जुन 1995 रोजी शिल्लक असलेली अर्धपगारी रजा वेगळी दाखवण्यात यावी व ती संपेपर्यंत अगोदरच्या शर्तीच्या अधिन राहून अर्धपगारी / परिवर्तीत रजा मंजूर करण्यात यावी.
💠 *7)* दिनांक 1 जुलै 1995 रोजी सेवेत असलेल्या शिक्षक / कर्मचा-यास फक्त अर्जित रजा अनुज्ञेय अनुज्ञेय राहिल.
💠 *8)* अर्जित रजा रोखीत वटविता येणार नाही. वरील अर्जित रजा कितीही दिवस साठविता येईल.कमाल दिवसांचे बंधन नाही.या अर्जित रजेच्या मागे आणि पुढे रविवार किंवा सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेता येणार नाहीत.
🌏(संकलित)🌏