Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


ए.पी.जे. अब्दुल कलाम

ए.पी.जे. अब्दुल कलाम

ए.पी.जे. अब्दुल कलाम
Abdulkalam04052007.jpg
पूर्ण नावअब्दुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म१५ ऑक्टोबर१९३१
रामेश्वर
मृत्यू२७ जुलै२०१५ (वय ८३)
शिलाँग
नागरिकत्वभारतीय
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्ममुस्लीम
कार्यसंस्थासंरक्षण संशोधन आणि विकास संस्था
प्रशिक्षणमद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
ख्यातीभारताचे माजी राष्ट्रपति
पुरस्कारपद्मभूषणपद्मविभूषणभारतरत्‍न
वडीलजैनुलाबदिन अब्दुल
डॉ. अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलामतथा ए. पी. जे. अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்; ऑक्टोबर १५इ.स. १९३१ - २७ जुलैइ.स. २०१५) हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलैइ.स. २००२ ते २५ जुलैइ.स. २००७[१]) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय झाले.

शिक्षणसंपादन करा

त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी (DRDO) संबंध आला.

कार्यसंपादन करा

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हाडीआरडीओमध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चेते प्रमुख झाले.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्‍या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत..

गौरवसंपादन करा

Year of Award or HonorName of Award or HonorAwarding Organization
१९८१पद्मभूषणभारत सरकार [२][३]
१९९०पद्मविभूषणभारत सरकार [२][३]
१९९७भारतरत्‍नभारत सरकार[३][४]
१९९७इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारभारत सरकार [३]
१९९८वीर सावरकर पुरस्कारभारत सरकार
२०००रामानुजम पुरस्कारमद्रासचे अल्वार रिसर्च सेंटर[३]
२००७किंग चार्ल्स (दुसरा) पदकब्रिटिश रॉयल सोसायटी[५][६]
२००७डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवीवॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापीठ, U.K[७]
२००८डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग(Honoris Causa)नान्यांग टेक्नॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर[८]
२००९हूवर पदकASME Foundation(अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स)[९]
२००९आंतरराष्ट्रीय von Kármán Wings पुरस्कारअमेरिकेतीलकॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, U.S.A[१०]
२०१०डॉक्टर ऑफ इंजिनिरिंगवॉटरलू विद्यापीठ[११]
२०११न्यू यॉर्कच्या IEEE (इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्टिकल अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स) या संस्थेचे समासदत्व.IEEE[१२]

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्दसंपादन करा

  • जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
  • शिक्षण : श्वार्ट्‌झ (Schwartz) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी (१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली (१९६०).
  • १९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
  • १९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
  • १९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर (ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
  • १९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
  • १९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
  • १९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
  • १९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
  • १९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
  • १९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
  • १९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
  • १९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
  • १९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री व डी.आर.डी.ओ.चे प्रमुख या नात्याने त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
  • १९९४ : 'माय जर्नी ' हा कवितासंग्रह प्रकाशित.
  • २५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
  • २००१ : सेवेतून निवृत्त.
  • २००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  • अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
  • इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
  • 'इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); 'भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध' या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
  • इंडिया - माय-ड्रीम
  • उन्‍नयन (ट्रान्सेन्डन्सचा मराठी अनुवाद, सकाळ प्रकाशन)
  • एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
  • विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक : माधुरी शानभाग.
  • सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
  • टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
  • टार्गेट ३ मिलियन (सहलेखक - सृजनपालसिंग)
  • ट्रान्सेन्डन्स : माय स्पिरिचुअल एक्‍सपिरिअन्सेस विथ प्रमुखस्वामीजी (सहलेखक - अरुण तिवारी)
  • दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
  • परिवर्तनाचा जाहीरनामा (मूळ इंग्रजी-अ मॅनिफेस्टो फॉर चेंज) सहलेखक - व्ही. पोतराज, मराठी अनुवाद - अशोक पाध्ये)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी).
  • बियाँण्ड २०१० : अ व्हिजन फॉर टुमॉरोज इंडिया (सहलेखक वाय.एस. राजन, मराठी अनुवाद-सकाळ प्रकाशन)

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तकेसंपादन करा

  • इटर्नल क्वेस्ट : लाइफ अँड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम - संपूर्ण जीवन (मूळ हिंदी, अरुण तिवारी, मराठी अनुवाद ??? )
  • ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद - मंदा आचार्य).
  • ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
  • प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : आर के पूर्ती)
  • ए.पी.जे. अब्दुल कलाम : संपूर्ण जीवन (अरुण तिवारी)
  • कर्मयोगी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम (डॉ. शरद कुंटे)
  • रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां.ग. महाजन)

एपीजे अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कारसंपादन करा

  • १९८१ : पद्मभूषण
  • १९९० : पद्मविभूषण
  • १९९७ : भारतरत्‍न
  • १९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
  • १९९८ : वीर सावरकर पुरस्कार
  • २००० : रामानुजन पुरस्कार
  • २००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
  • २००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
  • २००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
  • २००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
  • २०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
  • २०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
  • २०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरातओरिसाच्या किनार्‍याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.

निधनसंपादन करा

एपीजे अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना बिघडली. शिलाँगमधीलचएका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोकांच्या मनात ते अमर झाले .

संदर्भसंपादन करा

Tricks and Tips Tricks and Tips