whatsapp
व्हाटसअॅपच्या ताज्या बीटा आवृत्तीमध्ये युजर्ससाठी व्हिडीओ कॉलिंगचे फिचर प्रदान करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून व्हाटसअॅपवर व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आता व्हाटसअॅपवर हे फिचर कार्यान्वित करण्यात आले आहे. व्हाटसअॅपच्या प्रयोगात्मक अर्थात बीटा आवृत्तीधारकांना याचे अपडेट सध्या मिळाले आहे. या मॅसेंजरचे सध्या व्ही२.१६.३१६ ही आवृत्ती आता युजर्सला वापरण्यासाठी जारी करण्यात आली आहे. यात हे फिचर देण्यात आले आहे. ‘कॉल’ या टॅबवरच व्हिडीओ कॉलची सुविधा मिळणार आहे. यासाठी डायलर आयकॉनवर क्लिक करावे लागेल. अर्थात आपण ज्यांना कॉल करतोय तो युजरदेखील व्हाटसअॅपच्या बीटा आवृत्तीचा वापरकर्ता असेल तरच हे फिचर वापरता येणार आहे.
== संकलित ==