Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


Copyright

Whatsapp group वरून साभार

Copyright

       आपण सर्व *साहीत्यिक, कवी, लेखक* स्वता:च्या प्रतिभेने काही काही लिहीत असतो, व्यक्त होत असतो, पण समाजामध्ये काही वक्ती अशा आहेत कि ज्या त्या साहित्याचे *वाड्मय चौर्य करुन स्वता:च्या नावावर खपवत असतात* 
       नुकतेच महीन्यापुर्वी *श्री चंद्रशेखर गोखले* यांच्या *मी माझा* या प्रकाशीत चारोळीसंग्रहातील चारोळी एकाखाली एक रचुन त्याची कविता करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे, 
         अशा सर्व प्रकारांना *आळा* घालण्यासाठी व स्वता:चे साहीत्य *संरक्षित* करण्यासाठी सर्व, *लेखक, कवी,साहीत्यीक,रचनाकार* सर्वांनी खालील पोस्ट काळजीपुर्वक वाचावी व त्याप्रमाणे वागावे, व ही पोस्ट स्वताच्या संग्रही ठेवावी, आपल्या सर्व मित्रांना सेंड करावी हि विनंती.
    
*कवी.....*
*डॉ. रवींद्र वेदपाठक*
*तळेगाव* 

*Information given by Adv. Dev Upadhye*
*(Post source- Facebook)*

*● काॅपी राइट कायदा व साहित्यिक, कवि, गझलकार व कलावंत*

फक्त तुम्ही तुमच्या साहित्य कृती खाली तमचं नाव नि  ©  हे चिन्ह टाका नि आपली साहित्यकृती, संरक्षित करुन घ्या व चोराला तुरुंगाची हवा द्या. 

( विनंती : ही पोष्ट सर्वांना टॅग करु शकत नाही तांत्रिक अडचणीमुळे, त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी शेअर केल्यास जास्तीतजास्त लोकांना याचा फायदा होईल.)

परवाच एक कविता चोरल्या गेली. त्यांना तसेच सगळे कवि, गझलकार, तथा कांदबरी चित्रकार यांना हा प्रश्न प्रचंड भेडसावित आहे. त्यासाठीच्या काही तरतुदी.

१८६७ साली जर्मन मध्ये प्रथम इंटलेक्चुअल प्राॅपर्टी कायद्याचा वापर केला गेल्याचे आढळते. 

काॅपीराईट” म्हणजे असा हक्क जो तुमची बौध्दिक मालमत्ता संरक्षित करतो. हा अत्यंत चुकिचा समज आहे की, हा अधिकार केवळ छापिल पुस्तकांवरच असतो वा लेखणासंबधीच असतो. अगदी तुम्ही केलेल्या वस्तु सुध्दा यात अंतर्भुत आहे नि हे सर्व प्रकाशित असणंही गरजेच नाही. ती फक्त तुमची कलाकृती हवी इतकचं. हा हक्क तुम्हाला मरेपर्यंत नि मेल्या नंतरही जवळपास ६० वर्ष अबाधित असतो. LIC च्या जाहिरातीसारखा " जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी". हा कायदा नि तत्सम ५  कायदे व त्याच्या तरतुदी महत्वाच्या आहेत. याला आपण Intellectual Property Laws म्हणुया ज्यामधे 
अ) The Copyright Act 1957 (as amended by the Copyright Amendment Act 2012
ब) Trade and Merchandise Marks Act; 
क) Patents Act and the Designs Act. याचा अंतर्भाव होतो. 

कॉपीराईट कायद्या अतंर्गत नोंदणी अनिवार्य आहे का किंवा बाकी तरतुदी बघु.

१) The Copyright Act 1957 या कायद्याप्रमाणे आपण आपली कलाकृती पंजिबद्ध/ नोंदणीकृत करता येते, परंतु करणे अनिवार्य नसले तरीही करुन घेणे योग्यच. The Indian Partnership Act, 1932 या कायद्याप्रमाणेच हा ही कायदा आहे. भागीदारी नाेंदणी करणे कायद्याने गरजेचे नाही, पण केल्यास तुम्हाला जास्तीचे अधिकार प्राप्त होतात. तसेच The Copyright Act 1957 या कायद्याचेही आहे. या कायद्या अंतर्गत बाकी वरील कायद्याप्रमाणे अनिवार्यता नाही. फक्त तुम्ही तुमच्या साहित्य कृती खाली तमचं नाव नि © चिन्ह टाका नि आपली साहित्यकृती संरक्षित करुन घ्या नि चोराला जेल ची हवा दाखवा.

२) आपल्या डोक्यात नुसतीच आयडिया सुचून चालत नही तर ती कोणत्यातरी पर्मनन्ट फॉर्ममध्ये व्यक्त केलेली हवी जसे पोष्ट केलेली गझल/कविता, पुस्तक,वेबसाईट,मूर्ती किंवा एखादी रचना…तरच आपण ती नावीन्यपूर्ण कल्पना कॉपीराईट साठी ग्राह्यं धरली जाते. मला एखादा विषय सुचला पण त्यावर दुसरचं कुणी जर अगदी माझ्या मनातली लिहलं तरीही असं चालतं नाही, ते सर्वप्रथम तुम्हिच पोष्ट करायला हव़. तुमची अभिव्यक्ती नि ती कल्पना वेगळी हवी, विषय एक असु शकतो. प्रेम हा विषय त्यावरील तुमचे शब्द वेगळे हवेत नि आशयही वेगळा हवा. तो जेव्हा सारखाच असतो ती चोरी होते. गझलेच्या भाषेत "खयालोका टकराव" असेल फक्त तर चोरी म्हणता येणार नाही.

२)  section 62 व 63.  तुमच्या साहित्याची चोरी झाल्यास काय करता येईल ते सांगितलं आहे. section 63 says about,  Offence of infringement of copyright or other rights conferred by this Act. हा गुन्हा दखलपात्र ( cognizable) आहे, दखलपात्र म्हणजे तुम्हि पोलिसांकडे तक्रार केल्यास, त्याना याची दखल घेवुन, संबधित आरोपीवर गुन्हा दाखल करावा लागतो नि तो सिध्द झाल्यास त्याला कलम ६३ प्रमाणे कमित कमी ६ महिने नि जास्तित जास्त ३ वर्षे पर्यंत तुरुंगवास आणि कमितकमी ५०,००० (पन्नास हजार) नि जास्तीत जास्त २,००,०००  ( दोन लाख) पर्यंत दंड सुध्दा होवु शकतो, परंतु या चोरीपासुन जर त्याला/तिला आर्थिक फायदा होत नसेल तर न्यायालय शिक्षा व दंड कमी करु शकतं. तसेच दिवानी न्यायालयातही, कलम ६२ प्रमाणे  Injuction ( प्रतिबंध) व Dameges (नुकसान भरपाई) मागता येईल. यासाठीच मी वर बोललो की तुम्ही या कायद्या अंतर्गत नोंदणी केली असल्यास सर्टिफिकेट हा पुरावा म्हणुन उपयोगात आणला जातो व आपली केस मजबुत होते. तसेच काही पुरावे तयार करुन ठेवा, जसे 
१) लोकेशन आॅन ठेवणे,
२) वाटल्यास आपण लिहलेले एका डायरीतुन लिहुन त्याखाली सही व तारीख लिहावी. शाईचे वय (ink age) काढण्याईतपत तंत्रज्ञान पुढे गेलयं. 
३) स्वत:चा दुसरा ईमेल आय.डी. करुन त्यावर वेळोवेळी आपलं साहित्य आपणच सेंड करुन ठेवणे. कारण The Indian Evidence  Act, 1872 च्या कलम 3 प्रमाणे email हा document समजल्या जातो.

एस. आर. जयलक्ष्मी विरुद्ध मेटा म्युझिकल केसमध्ये चेन्नई उच्च न्यायालयाद्वारे याची copy right ची व्याप्ती निर्धारित केली आहे.एक गमतीदार गोष्ट म्हणजे काही देशात तर अगदी खाजगी पत्रे,हेअरकट,परीक्षेचा पेपर,पुलावरील सजावट अशा गोष्टीही कॉपीराईट करण्यास परवानगी आहे.

कॉम्प्युटर मधील प्रोग्राम हा कॉपीराईट कायद्या अंतर्गत येतो तर त्याच प्रोग्राम चा फ्लो चार्ट पेटंट अंतर्गत येतो.कारण पेटंट मध्ये प्रोसेस पेटंट केली जाते जेणे करून इतर कोणी त्या स्पेसिफिक प्रोसेसचा वापर करू शकत नाही आणि कॉपीराईट मध्ये इतर कोणीही प्रोग्राम ची जशी च्या तशी नक्कल करू शकत नाही असे प्रोटेक्शन दिलेले असते.

कॉपीराईट कायद्यांतर्गत आपणस पुढील अधिकार मिळतात.

पब्लिकला आपले कॉपी प्रोटेक्टेड काम विकणे किंवा भाड्याने देणे.

कामाच्या अधारीत शो किंवा कार्यक्रम आयोजित करणे.

कामाबद्दल इतरांना महिती देणे.

स्वतःच्या वा व्यावसायिक कामासाठी याचा वापर करणे.

कामाचे प्रदर्शन किंवा विक्री करणे.

आपण बऱ्याच ठिकाणी (C) हे चिन्ह पाहते ते चिन्ह कॉपीराईट प्रोटेक्टेड हे दर्शविते हे मी वरच सांगितले आहे.

आता आपण अपवाद बघुया.
अपवाद
१) संशोधना करिता कलाकाराच्या नावासहित वापरत असाल तर
२) टिका/ समिक्षे करिता कलाकाराच्या नावासहित वापरत असाल तर
३) कलाकाराच्या नावासहित पोष्ट करीत असाल तर
४) कलेचा योग्य वापर (fair dealing) होत असेल, परंतु गमतीचा भाग म्हणजे  योग्य वापर (fair dealing) ची व्याख्या मात्र The Copyright Act 1957,  मधे कुठेच दिली नाही.  त्यासाठी आपल्या खालिल न्याय विवाडे बघावे लागतील. १)  Academy of General Education v. B. Malini Mallya (2009) सुप्रिम कोर्ट

२) Civic Chandran v. Ammini Amma. केरळ उच्च न्यायालय.

शेवटी महत्वाचे केस कुठे दाखल कराल (juirsdiction)

कलम ६२ प्रमाणे दिवानी दावा हा तुम्हि  जिथे राहता तिथे वा तुमचा व्यवसाय करता तिथे व कलम ६३ प्रमाणे सुध्दा फौजदारी तक्रारीकरिता सुध्दा वरीलप्रमाणेच. या साठी मा. सर्वोच्च न्यायालयाचा विवाडा बघा.
 Indian Per Rights Society Ltd. Vs. Sanjay Dalia and another - - २०१५

भारताची कॉपीराईटसंबंधित अधिकृत वेबसाईट: 
http://copyright.gov.in/Default.aspx

तर थोडक्यात न घाबरता तक्रार द्या चाेर आपोआप सरळ होतील. 

 © अॅड. देव उपाध्ये
    9823536480



   #### .संकलित ####
Tricks and Tips Tricks and Tips