सिंधुताई सपकाळ (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४७;वर्धा, महाराष्ट्र - हयात) या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठीभाषक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे समाजकार्य केले आहे.
== जी
तिने Abhimanji साठे, व्यवसायाने एक गुराखी करण्यासाठी वर्धा जिल्हा, महाराष्ट्र मध्ये पिंपरी मेघे गावात 14 नोव्हेंबर 1948 रोजी जन्म झाला. एखादा नको असलेला मुलाला असल्याने, ती 'Chindhi' (वस्त्राने फाटलेल्या तुकडा) टोपणनावे आली. तिचे वडील खूपच तिच्या आई च्या शुभेच्छा विरुद्ध सिंधुताई शिक्षित वर उत्सुक होते. सिंधुताईंनी खूप शिकावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, Abhimanji ती कारण आर्थिक कारणांमुळे प्रत्यक्ष दुधी घेऊ शकले नाही म्हणून तिला दुधी म्हणून 'Bharadi वृक्ष आदींचे' वापर होईल जेथे गुरेढोरे चरण्याची, च्या खोटी सबब अंतर्गत शाळेत तिला पाठवण्यासाठी वापरला. गर्हणीय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न ती 4 था ग्रेड पास झाल्यावर औपचारिक शिक्षण सोडण्याच्या तिला भाग पाडले. [2] पण Abhimanji साठे पत्नीच्या विरोधात जाऊ शकले नाहीत, आणि परिणामी सिंधुताईंचे लग्न वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी करून दिले गेले. 10 निविदा वयाच्या ती Shrihari Sapkal उर्फ Harbaji , वर्धा जिल्ह्यातील Navargaon गावातून 30 वर्षीय गुराखी लग्न आला . तिने 20 चालू वेळ 3 मुलगे भोक . तिने भारतात इंधन म्हणून वापरले वाळलेल्या शेण गोळा वर गावकर्यांना fleecing आणि गावातील काही कोणाचे न करता, वन विभाग सह संगनमत मध्ये विक्री होता स्थानिक अत्यंत विरूद्ध यशस्वी आंदोलन लावले . तिचे आंदोलन तिच्या गावात जिल्हाधिकारी आणले आणि तिला योग्य होता लक्षात घेऊन वर , तो अत्यंत आवडत नाही जे ऑर्डर झाली . एक गरीब महिलेच्या हस्ते अपमान करून स्टींग चे भू.का. रुप , तो तिच्या गर्भधारणेच्या 9 महिने पलीकडे असताना तिला अंतर देणे तिच्या पती पटवणे व्यवस्थापित . तिने सर्व स्वत: करून , त्या रात्री त्यांच्या घरात बाहेर एक गाय निवारा मध्ये 14 ऑक्टोबर 1973 रोजी बाळ मुलगी जन्म दिला आणि काही किलोमीटर अंतरावर निवारा तिला नकार दिला कोण तिच्या आईच्या ठिकाणी देवा . तिने आत्महत्या विचार बाजूला सेट होते आणि अन्न रेल्वे प्लॅटफॉर्मवर भिकेचा सुरु . ह्या प्रक्रियेत, ती त्यांच्या पालकांना सोडलेले त्यामुळे अनेक मुले आहेत लक्षात आले की तिने स्वत म्हणून त्यांना दत्तक आणि त्यांना पोसणे आणखी अति जलद घडणारी क्रिया भिकेचा सुरु . तिने अनाथ म्हणून तिला आला कोणीही आणि प्रत्येकासाठी एक आई होण्यासाठी ठरविले. ती नंतर फक्त तिच्या कन्या आणि दत्तक विषयावर दरम्यान पक्षपात भावना दूर करण्यासाठी , विश्वास श्रीमंत Dagdu शेठ Halwai , पुणे तिला जैविक मुलाला दान . [ 3 ] ती अनाथ तिला संपूर्ण जीवन दिला आहे . परिणामी ती प्रेमपुर्वक ' मै ' ( आई ) § म्हणतात . तिने 1050 अनाथ मुले प्रती संगोपन आहे . आज ती एक भव्य कुटुंब आहे 207 मुलगा इन कायद्यात , 36 मुलगी कायद्यात इन आणि 1000 प्रती grandchildren . तरीही ती पुढील जेवण लढा आहे. ती दत्तक ज्याच्या मुलांना अनेक तसेच सुशिक्षित वकील आणि डॉक्टर आहेत , आणि तिच्या जैविक मुलगी काही , त्यांच्या स्वत: च्या स्वतंत्र orphanages चालवत आहेत. तिची मुले एक एक पीएच.डी. करत आहे तिच्या जीवन . अहिल्याबाई होळकर पुरस्कार , स्त्री व बाल कल्याण क्षेत्रात सामाजिक कामगारांना महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या - ती 2010 समावेश तिच्या समर्पण आणि कामासाठी 272 प्रती पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे . तिने तिच्या अनाथ मुलांसाठी घर करण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी सर्व पैसे वापरले . बांधकाम सुरु आहे आणि ती जगात अजूनही अधिक मदत शोधत आहे . Sanmati बाळ Niketan 300 प्रती मुले राहता येईल जेथे हडपसर , पुणे येथे Manjari परिसर बांधले जात आहे . खात्री चांगली कमाई अट बनवण्यासाठी पण तसेच दर्जेदार शिक्षण प्रदान करून त्यांच्या भावी सुरक्षित करण्यासाठी केला जाईल काम भरपूर आहे . 2010 मध्ये प्रकाशीत मराठी चित्रपट ' मी Sindhutai Sapkal ' , Sindhutai Sapkal खरे कथा प्रेरणा एक जैव PIC आहे . चित्रपट 54th लंडन चित्रपट महोत्सवात जागतिक प्रीमिअरच्या निवड झाली . ती एक उत्तम वक्ते आहे आणि ती पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत orphanages आणि विश्वास आहे . 80 वयाच्या तिचे पती तिला परत apologetically आले . तिने तिच्या मुलाला ती आता फक्त एक आई आहे आलेला म्हणून त्याला स्वीकारले ! आपण तिच्या आश्रम भेट तर , ती अभिमानाने आणि अतिशय प्रेमाने तिच्या सर्वात जुनी मूल म्हणून त्याला समाविष्टीत ! व्यक्ती , ती निश्चितपणे कोणतीही नकारात्मक भावना किंवा blaming कोणिही सह , ऊर्जा आणि खूप शक्तिशाली प्रेरणा अमर्यादित स्रोत म्हणून. -->
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी महाराञ्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव अतिशय मागासलेले असल्याने शहरी सुविधांचा स्पर्श नव्हता. कुणाला शिक्षणाचा गंध नाही, अशीच सगळी परिस्थिती होती. चिंधी (सिंधू) ही सर्वांत मोठी मुलगी. पाठी एक भाऊ, एक बहीण. त्या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरी मेघे गावात आले. मुलीने शिकावे अशी वडलांची इच्छा. पण आईचा मात्र सक्त विरोध. मग ते सिंधुताईंना माईंना गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी त्यांना जेमेतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आले,
सिंधुताईंचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाला.आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. घरी प्रचंड सासुरवास होता.. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून आधाशासारख्या नजर फिरवायच्या.
अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी पण शेण काढणा्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती.
घराबाहेर काढले
दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार मग सुरू केला. नवर्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकर्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली.
परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले.
सहभोजन
सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवठी सिंधुताईंनी स्मशान गाठले.
पुरस्कार व गौरव
सिंधुताईंना २७३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांतले काही :-
- पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजने दिलेला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (२०१२).
- २०१० - स्त्री व बाल कल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार.
- मूर्तिमंत आईसाठीचा २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार.
- आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार १९९६.
- सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
- राजाई पुरस्कार.
- शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
- श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार १९९२.
- सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशन दिलेला रिअल हीरो पुरस्कार (२०१२).
- २००८ - दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार.
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)