कृपया लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे online status लपवू शकत नाही, पण हे स्टेटस कोण बघू शकेल हे मात्र तुम्ही ठरवू शकता.
ही सेटिंग्ज बदलण्यासाठी पुढील मार्गाने जा WhatsApp > Menu Button > Settings > Account > Privacy.
येथे तुम्ही last seen, profile photo and/or status साठी पुढील पर्याय वेगवेगळे सेट करु शकता.
Everyone
Your last seen, profile photo and/or status हे सर्व व्हॉटस्अॅप यूझरसाठी उपलब्ध होईल.
My Contacts
तुमच्या अॅड्रेस बुक मधील युझर साठीच वरील स्टेटस दिसतील.
Nobody
तुमचे Your last seen, profile photo and/or status कोणालाही उपलब्ध होणार नाही.
The Information WhatsApp Collects:
व्हॉटस्अॅपच्या Privacy Notice प्रमाणे व्हॉटस्अॅप यूझरचे मोबाइल फोन नंबर, पुश नोटीफिकेशन नांव आणि मोबाइल डिव्हाइस ची माहिती गोळा करते. तसेच कुकीजची माहिती आणि लॉग फाइल ची माहिती सुध्दा व्हॉटस्अॅप गोळा करते.
पण व्हॉट्सअॅप सोबत संलग्न मोबाइल नंबर शिवाय, तुमच्या अॅड्रेस बुक मधील किंवा कॉन्टॅक्ट लिस्ट मधील नांवे, अॅड्रेस, इमेल किंवा इतर कोणतीही माहिती गोळा करीत नाही.
Block someone:
तुम्ही एखादया कॉन्टॅक्टचा नंबर Blocked list मध्ये टाकून मॅसेज पाठवण्यापासून प्रतिबंध करु शकता.
To block a contact on your Android phone:
व्हॉट्सअॅपच्या चॅट स्क्रिन वर जा.पुढील मार्गाने जा Menu Button > Settings > Account > Privacy > Blocked Contacts
येथे तुम्ही ब्लॉक केलेल्या सर्व कॉन्टॅक्टची यादी दिसेल.वरील उजव्या बाजूला Add blocked contacts आयकॉनवर प्रेस करा.
Take care while switch phone number:
व्हॉट्सअॅप मध्ये एक प्राव्हसी विकनेस आहे, जो जेव्हा यूझर त्यांचे मोबाइल नंबर बदलवतात तेव्हा दिसून येतो. यूझरची सर्व माहिती सर्व्हरवर स्टोअर केली जाते आणि नंतर हा नंबर जेव्हा इतरांकडे जातो तेव्हा त्यांच्या मोबाइलवर हि माहिती चुकून डाउनलोड केली जाऊ शकते.जरी व्हॉट्सअॅप नुसार जेव्हा एखादे अकाउंट 45 दिवस निष्क्रिय असते, तेव्हा ते जुन्या फोन नंबर वरून आपोआप डिसकनेक्ट होते आणि यूझरची सर्व माहिती आणि मॅसेजेस डिलीट होतात. पण सुरक्षेततेकरीता, जर तुम्ही तुमचा नंबर बदलवत असाल तर आधि या जुन्या नंबर वरुन नविन नंबरवर तुमचे व्हॉट्सअॅपचे अकाउंटर ट्रान्स्फर करा.