Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


स्वर व व्यंजन






स्वर व व्यंजन



वर्ण


 ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.


१.स्वर :ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .
१.ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
२.दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
३.स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात उदा-अं,आ:
४.सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थाना
तून निघणारे उदा-अ,आ /इ,ई /उ ,ऊ .
५.विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर उदा-अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
६.सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले 
स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय .
उदा-अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .


व्यंजन


 ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .
१.महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
२.अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
३.स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
४.अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
५.उष्ण व्यंजन :श ,ष ,स
६.नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .


वर्णाची उच्चार स्थाने


१.कंठ्य :क,अ,आ.
२.तालव्य :च,इ,ई,
३.मूर्धन्य :ट ,र,स.
४.दंत्य : त,ल,स
५.ओष्ठ्य :प,उ,ऊ .
६.अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
७.कंठ तालव्य :ए ,ऐ.
८.कंठ ओष्ठ :ओ,औ.
९.दान्तोष्ठ : व .

वर्णमाला शिकवितांना वापरावयाचे दृक श्राव्य साधने


१.वर्णमालेच तक्ता वापरणे.
२.शब्द पट्या वापराव्या.
३.चित्राचा वापर करावा –गरुड “ग”
४.खादा फलक वापरावा.
५.रेषा,गोल,अर्धवर्तुळ ,कमान काढून दाखवणे,
६.रंगीत खडू व रंगीत चित्राचा वापर 
करणे .
७.विद्यार्थाला वर्णमालेच्या वह्या बाजारा
तुन उपलब्ध करून देऊन प्रात्यक्षिक देणे.
८.हस्ताक्षर स्पर्धा घेणे.



                     ==  संकलित  ==
Tricks and Tips Tricks and Tips