Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


विरामचिन्हे

विरामचिन्हे

१) पूर्णविराम( . ) :- वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. एखाद्या शब्दाचे संक्षिप्त स्वरूप दाखवण्यासाठी हे वापरतात.
उदा. अ) मी मराठी बोलतो. ब) वि. वा. शिरवाडकर

२) स्वल्पविराम( , ) :- 
एकाच विभागातील शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. एखाद्याला संबोधून हाक मारण्यासाठी हे चिन्ह वापरतात.
उदा. अ) शीतकपाटात गाजरे, पालक, बीट, काकडी आहेत. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू.

३) अर्धविराम( ; ) :- 
दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून हे चिन्ह वापरले जाते.
उदा. त्याने खूप मेहनत केली ; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही.

४) अपूर्णविराम( : ):- 
एखाद्या बाबीची माहिती द्यायची असल्यास हे चिन्ह वापरतात.
उदा. पुणे विभागातील जिल्हे पुढीलप्रमाणे : सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे.

५) प्रश्नचिन्ह( ? ) :- 
एखद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते.
उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

६) उद्गारवाचक चिन्ह( ! ) :-
 आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते. हे चिन्ह भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात.
उदा. अरे वा ! किती सुंदर फुले आहेत. अभिनंदन ! अशीच प्रगती करा.

७) एकेरी अवतरणचिन्ह( ‘ ’ ) :- 
एखाद्याचे वाक्य दुसरयाला अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी किंवा एखाद्या शब्दाचे महत्त्व पटवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात.
उदा. अ) पुण्याला महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक’ राजधानी म्हणून ओळखले जाते. 
ब) ते म्हणाले, ‘मी आज येणार आहे.’

८) दुहेरी अवतरणचिन्ह( “ ” ):- 
एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात.
उदा. टिळक म्हणाले,” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.”

९) संयोगचिन्ह( - ):- 
दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरतात.
उदा. भक्ती-भाव, पूजा-अर्चा, वह्या-पुस्तके.

१०) अपसरणचिन्ह( – ) :- 
बोलताना वाक्य मधून तुटल्यास, किंवा एखाद्या वाक्याबद्दल अधिक स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरतात.
उदा. अ) मी आज येऊ शकतो पण– ब) या गाडीचा एक भाग असा आहे जो– खराब आहे.

११) विकल्पचिन्ह( / )- 
एखाद्या शब्दाबद्दल पर्यायी शब्द वापरताना हे चिन्ह उपयोगी पडते.
उदा. मी आंबा/पेरू खाईन.

१२) कंस(   ) 
एखाद्या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगताना तो शब्द वाक्यात नसावा असे दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात.
उदा. तो(अभिषेक) उद्या येईल.

Tricks and Tips Tricks and Tips