हळदी कुमकुम, लेक शिकवा उद्बोधन वर्ग व बाल आनंद मेळाव्याचे दुग्ध शर्करा आयोजन
माता पालकांना “लेक वाचवा, लेक शिकवा” या उद्बोधन वर्गाच्या आयोजनामुळे महिलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन मुलींच्या शिक्षणाप्रती महिला जागरूक होतील.
= चंद्रभागा नागोसे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष
माता पालक मेळावा व हळदी कुमकुम यासारख्या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये शाळेप्रती आपुलकी निर्माण होऊन कॉन्वेंटकडे जाणारा लोंढा जिल्हा परिषद शाळेकडे वळून पटसंख्या वाढण्यास मदत होईल.
= रुपाली चचाने, ग्रामपंचायत सरपंच
पंचायत समिती काटोल मधील वाघोडा ( खुटांबा ) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत माता पालक मेळाव्याचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष चंद्रभागा नागोसे यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत सरपंच रुपाली पिराजी चचाने यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. माता पालक मेळाव्याचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुमकुम तसेच संगीत खुर्ची, लंगडी, फुगडी, रांगोळी, उखाणे, गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसहीत सर्व महिलांसाठी जेवणाची व्यवस्था शाळेतर्फे करण्यात आली. यावेळी निर्मला देशभ्रतार, वंदना उइके, विमल नाखले, बेबी चौधरी, रत्नमाला कोटजावले, माधुरी राऊत, नंदा मोंढे, नलिनी चौधरी, अर्चना नेहारे, बबिता सलाम, अन्नपूर्णा कातलाम, चित्रा आत्राम, नर्मदा दूधकवळे, प्रतिभा कोहळे, निर्मला नागोसे, प्रतिभा मरस्कोल्हे, मीना गजभिये, दिव्या कातलाम, नंदिनी आत्राम, प्रतिभा चौधरी, सविता नेहारे, आदींसह सव्वाशे महिलांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन वंदना उईके व आभारप्रदर्शन दिव्या कातलाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक गणेश जोगेकर, दिलीप बेलखेडे, अजय तातोडे, कमलेश सोनकुसळे, आदींनी परिश्रम घेतले.