Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


20 December 2025

 सांग मला....


तुझ्या माझ्यातला चांदवा कुठे आहे सांग मला 

तुझ्या माझ्यातला गोडवा कुठे आहे सांग मला 


हरवुनी भान हे छेडले तराणे अलवार सखे 

तुझ्या माझ्यातला मारवा कुठे आहे सांग मला


कळावा बोचरा ढंग पावसाचा पुन्हा तुजला

तुझ्या माझ्यातला गारवा कुठे आहे सांग मला


तुला घेण्या मिठीत अगदी मजेत ऋतू आसुसला 

तुझ्या माझ्यातला लाजवा कुठे आहे सांग मला 


कुणी वेचून हे शिंपले अता मोती ऐक जरा

तुझ्या माझ्यातला पारवा कुठे आहे सांग मला 


© कमलेश सोनकुसळे 

काटोल, 7588691372

28 September 2021

23 October 2020

नवोदय प्रवेश परीक्षा


नवोदय प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकला टच करा






08 April 2019

UNESCO SCHOOL CLUB

🙏🙏🙏🙏🙏
        We are so glad to convey that our "Z. P. Upper Primary School Waghoda (Khutamba) join with
 UNESCO  SCHOOL CLUB.
       I am so thankful to Mr. Jogekar, Mr. Belkhede, Mr. Pathade, Mr. Tatode and all student who  support me directly and indirectly to achieve this membership.

Thanks a lot.
🙏🙏🙏🙏🙏
K t Sonkusale






10 February 2019


जिल्हा विज्ञान प्रदर्शनी नागपूर
लोकसंख्या शिक्षण (प्राथमिक गट)
" लेक वाचवा, लेक शिकवा "
31जाने ते 3 फेब्रु 2019
C G wanjari college नागपूर









वाघोडा शाळेत माता पालक मेळावा उत्साहात साजरा


हळदी कुमकुम, लेक शिकवा उद्बोधन वर्ग व बाल आनंद मेळाव्याचे दुग्ध शर्करा आयोजन


माता पालकांना “लेक वाचवा, लेक शिकवा” या उद्बोधन वर्गाच्या आयोजनामुळे महिलांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन मुलींच्या शिक्षणाप्रती महिला जागरूक होतील.

= चंद्रभागा नागोसे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष




माता पालक मेळावा व हळदी कुमकुम यासारख्या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये शाळेप्रती आपुलकी निर्माण होऊन कॉन्वेंटकडे जाणारा लोंढा जिल्हा परिषद शाळेकडे वळून पटसंख्या वाढण्यास मदत होईल.

= रुपाली चचाने, ग्रामपंचायत सरपंच 





पंचायत समिती काटोल मधील वाघोडा ( खुटांबा ) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत माता पालक मेळाव्याचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष चंद्रभागा नागोसे  यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत सरपंच रुपाली पिराजी चचाने यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. माता पालक मेळाव्याचे औचित्य साधून  महिलांसाठी हळदी कुमकुम तसेच संगीत खुर्ची, लंगडी, फुगडी, रांगोळी, उखाणे, गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसहीत सर्व महिलांसाठी जेवणाची व्यवस्था शाळेतर्फे करण्यात आली. यावेळी निर्मला देशभ्रतार, वंदना उइके, विमल नाखले, बेबी चौधरी,  रत्नमाला कोटजावले, माधुरी राऊत, नंदा मोंढे, नलिनी चौधरी, अर्चना नेहारे, बबिता सलाम, अन्नपूर्णा कातलाम, चित्रा आत्राम, नर्मदा दूधकवळे, प्रतिभा कोहळे, निर्मला नागोसे, प्रतिभा मरस्कोल्हे, मीना गजभिये,  दिव्या कातलाम, नंदिनी आत्राम, प्रतिभा चौधरी, सविता  नेहारे, आदींसह सव्वाशे महिलांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन वंदना उईके व  आभारप्रदर्शन दिव्या कातलाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक गणेश जोगेकर, दिलीप बेलखेडे, अजय तातोडे, कमलेश सोनकुसळे, आदींनी परिश्रम घेतले.































वाघोडा ( खुटांबा ) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

अंजली गजभिये ठरली student of the year award ची मानकरी 

आजी-माजी विद्यार्थ्यांचा गौरव 

पंचायत समिती काटोल मधील वाघोडा ( खुटांबा ) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश धुर्वे यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत सरपंचा रुपाली पिराजी चचाने यांचे प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक गणेश जोगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, पिरॅमिड, लेझीम संचलन, नाटिका, इत्यादी कार्यक्रम सादर केलेत. यावेळी student of the year ठरलेली इयत्ता ६ वीची विद्यार्थीनी अंजली युवराज गजभिये, सन २०१८ मधील गावातील १० वीच्या परीक्षेत प्राविण्यप्राप्त मंथन विनोद जाधव, १२ वीच्या परीक्षेत अव्वल विद्यार्थीनी दिव्या गोविंद कातलाम यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच रुपाली चचाने व वंदना देवानंद उईके यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व १००१/- रोख देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा चंद्रभागा नागोसे, पोलीस पाटील रोशनी मोंढे, उपसरपंच प्रविण शेंडे, सुधाकर चौधरी, संदीप कातलाम, रत्नमाला कोटजावळे, बबिता सलाम, नंदा मोंढे, माधुरी राऊत, धनराज नेहारे, चित्रा आत्राम, वर्षा खोब्रागडे, साधना गजभिये, हिम्मत नाखले, अरविंद श्रीराव, प्रभाकर चौधरी आदींची उपस्थिती होती. 
       प्रास्ताविक गणेश जोगेकर, सुत्रसंचालन दिलीप बेलखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोहर पठाडे, अजय तातोडे, कमलेश सोनकुसळे, गणेश उईके, दीक्षांत वाहने, कोमल आत्राम, हरीश भोंडवे, सुरज वाहने आदींनी परिश्रम घेतले.



















Tricks and Tips Tricks and Tips