Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


विभाज्यतेच्या कसोट्या

विभाज्यतेच्या कसोट्या

{1} *2 ची कसोटी* - ज्या संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो.

{2} *3 ची कसोटी* - ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो; त्या संख्येला 3 ने निःशेष भाग जातो.

{3} *4 ची कसोटी* - ज्या संख्येतील दशक व एकक यांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जातो; त्या संख्येला 4 ने निःशेष भाग जातो.

{4} *5 ची कसोटी* - ज्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 हा अंक असतो त्या संख्येला 5 ने निःशेष भाग जातो.

{5} *6 ची कसोटी* - ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो.

{6} *7 ची कसोटी* - संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणा-या संख्येतून डावीकडील उरलेल्या अंकांनी तयार झालेली संख्या वजा करून आलेल्या संख्येस वजा करून आलेल्या संख्येस 7 ने निःशेष भाग गेल्यास त्या संख्येला 7 ने निःशेष भाग जातो.

{7} *8 ची कसोटी* - ज्या संख्येतील शतक, दशक व एकक यांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जातो त्या संख्येला 8 ने निःशेष भाग जातो.

{8} *9 ची कसोटी* - ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने निःशेष भाग जातो.

{9} *10 ची कसोटी* - ज्या संख्येतील एककस्थानचा अंक 0 असतो त्या संख्येला 10 ने निःशेष भाग जातो.

{10} *11 ची कसोटी* - ज्या संख्येतील सम स्थानावरील अंकांची बेरीज व विषम स्थानांवरील अंकांची बेरीज यामधील फरक 0 असेल किंवा 11 ने भाग जाणारा असेल तर त्या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो.

{11} *12 ची कसोटी* - ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने निःशेष भाग जातो.
        
{12} *15 ची कसोटी* - ज्या संख्येला 3 व 5 ने भाग जातो त्या संख्येला 15 ने निःशेष भाग जातो.

{13} *18 ची कसोटी* - ज्या संख्येला 2 व 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने निःशेष भाग जातो.

{14} *36 ची कसोटी* - ज्या संख्येच्या अंकास 9 ने भाग जातो आणि ज्या संख्येतील शेवटच्या अंकांना 4 ने भाग जातो त्या संख्येस 36 ने भाग जातो किंवा ज्या संख्येला 9 व 4 ने निःशेष भाग जातो, त्या संख्येला 36 ने निःशेष भाग जातो.

{15} *72 ची कसोटी* - ज्या संख्येला 9 व 8 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला 72 ने निःशेष भाग जातो.

## संकलित ##
Tricks and Tips Tricks and Tips