Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


अशी बनवा तुमच्या नावाची रिंगटोन

मोबाईल फोन आणि त्याची रिंगटोन हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर ठरत असतं. कित्येकदा एकाच कंपनीचा मोबाईल असला की बहुतेकवेळा त्याची ठरलेलीच रिंगटोन वाजत असते. त्यामुळे मग नेमका कोणाचा फोन वाजतो ते कळत नाही. पण आता आम्ही तुम्हाला असा एक पर्याय सांगणार आहोत की ज्यामुळे तुम्ही तुमच्या नावाची रिंगटोन बनवू शकता. त्याच त्याच रिंगटोनचा कंटाळा आला असेल तर तुम्ही काही मिनिटांमध्ये पैसे खर्च न करता तुमच्या नावाची रिंगटोन तयार करू शकता. स्वतःच्या नावाची रिंगटोन विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर वापरुन व थोडीशी मेहनत घेऊन बनविता येणे शक्य आहे.
१. मोबाइल किंवा संगणकावरुन http://freedownloadmobileringtones.com या वेबसाइटला भेट द्या.
यानंतर एका ब्ल्यू बँडवर सर्च रिंगटोन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
२. त्यानंतर नवीन पेज ओपन होऊन तिथे एक बॉक्स येईल. त्या बॉक्समध्ये तुमचं किंवा तुम्हाला हवं असलेलं नाव टाइप करून रिंगटोन सर्च करा.
३. सर्च केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या रिंगटोन मिळतील. त्यामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या रिंगटोनवर क्लिक करा. तयार केलेली रिंगटोन हवी असल्यास ती डाऊनलोड करू शकता.
४. रिंगटोनच्या खाली डाऊनलोडचा एक पर्याय दिलेला आहे. त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल.
५. डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर तयार झालेली रिंगटोन दिसेल. प्ले करून तुम्ही ती रिंगटोन ऐकू शकता. तिथेच रिंगटोन या चिन्हावर क्लिक केल्यानंतर ती डाऊनलोड होईल.
Tricks and Tips Tricks and Tips