Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


कल्पना चावला

कल्पना चावला


कल्पना चावला
कल्‍पना चावला (मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल,हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.

व्यक्तिगत माहितीसंपादन करा

कल्पना बनारसीलाल चावला यांचा जन्मकर्नालहरयाणा येथे झाला.

शिक्षणसंपादन करा

कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिङ्ग्टनच्या टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण करून घेऊन, त्यांनी कोलोराडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.

कार्यसंपादन करा

डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला.

मृत्यूसंपादन करा

१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्‍या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कराडचे कल्पना चावला विज्ञान केंद्रसंपादन करा

कल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कराडच्या टिळक ’ हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञान शिक्षकांनी कल्पना चावलांच्या वडिलांच्या, बनारसीलाल चावला यांच्या परवानगीने कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र मुलांमध्ये विज्ञानाचा प्रसार करून त्यांना विज्ञानाची गोडी लावण्याचे कार्य करते.
मुलाला पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे त्याला प्रत्यक्ष कृतीमधून शोधता आली पाहिजेत, विज्ञानाच्या निकषांवर त्याला विचार करता यायला पाहिजे, प्रयोग करता आले पाहिजेत, अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून उभे केलेले हे ’कल्पना चावला विज्ञान केंद्र’, संजय पुजारी यांनी १ जुलै २००६ या दिवशी स्थापन केले.
कल्पना चावला विज्ञाना केंद्राचे कार्य कसे चालते, हे पाहण्यासाठी कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला यांनी केंद्राला भेट दिली होती. त्‍यांनी केंद्राचे काम पाहून मोठी देणगीसुद्धा दिली. कल्पना चावला यांच्या भगिनी सुनीतादीदी यांनीही ५० हजार रुपये किमतीची पुस्तके या केंद्रासाठी दिली. भारतात या नावाचे हे एकमेव केंद्र असेल अशी ग्वाही बनारसीलाल यांनी दिली.
या विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञानाच्या विविध मूलभूत शाखा यांविषयीची अनेक पुस्तके, विश्वकोश, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांना संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो.
‘शाळेबाहेरची शाळा’ असे या केंद्राच्या कार्याचे स्वरूप आहे. हसतखेळत आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानाचे शिक्षण देणे हे कल्पना चावला विज्ञान केंद्राचे धोरण आहे. या दृष्टीने केंद्राचे समन्वयक म्हणून काम करणारे पुजारी सर आणि त्यांना मदत करणारे त्यांचे इतर शिक्षक सहकारी सतत प्रयत्‍नशील असतात.

केंद्राचे कार्यक्रम आणि उपक्रमसंपादन करा

वर्षांतल्या ५२ रविवारी आणि अन्य सुट्ट्यांच्या दिवशी कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये विविध विज्ञानविषयक कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते. आकाशनिरीक्षण, विमानांच्या आणि अग्निबाणांच्या प्रतिकृती, पक्षिनिरीक्षण, वनस्पतींची ओळख, औद्योगिक क्षेत्रांना तसेच विज्ञान संशोधन केंद्रांना भेटी, जंगलभ्रमंती, शास्त्रज्ञांची, तज्ज्ञांची व्याख्याने, खेळण्यांमधून विज्ञान समजून घेणे, शालेय पुस्तकातील विज्ञानाची तत्त्वे प्रयोगांच्या आधारे समजून घेणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमांतून मुलांना विज्ञानाची गोडी लावण्याचे काम या विज्ञान केंद्रात केले जाते.
कल्पना चावला विज्ञान केंद्राचा साचेबद्ध असा कोणताही कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा नाहीत आणि म्हणूनच कोणतेही ताणतणाव नाहीत. प्रत्येक रविवार वेगळा असतो. त्यामुळे मुलेसुद्धा प्रत्येक रविवारची आणि सुट्टीच्या दिवसाची वेगळ्या अर्थाने वाट पाहत असतात.

विज्ञान शिकण्याची वेगळी पद्धतसंपादन करा

कल्पना चावला केंद्रात शिकविण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. केंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना या संदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात.
थोडक्यात, या उपक्रमामधून केवळ विमानांच्या प्रतिकृती करण्याचे कौशल्य मुले शिकत नाहीत तर त्यामागचे विज्ञानसुद्धा समजून घेतात. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर, विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता, ज्येष्ठ आकाश अभ्यासक हेमंत मोने, विज्ञानलेखक प्रा. मोहन आपटे अशा अनेक नामवंतांशी संवाद साधण्याची संधी कल्पना चावला विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कराडच्या मुलांना मिळाली आहे.
पुजारी सरांनी कल्पना चावला विज्ञान केंद्रातर्फे २००८ साली नाट्यरूपांतराच्या आणि सिनेमाच्या माध्यमांतूनही विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्‍न केला. ३४ बालकलाकारांना घेऊन ‘धमाल विज्ञानाची’ हा बालचित्रपट केंद्राने तयार केला. गॅलिलिओगॅलिली, सर आयझॅक न्यूटन आणि थॉमस अल्व्हा एडिसन हे तीन शास्त्रज्ञ मुलांना भेटतात आणि आपण लावलेल्या शोधांबद्दलचे प्रयोग त्यांना दाखवितात, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ ही कराडची नवी ओळख झाली आहे.

गौरवसंपादन करा

२०११ साली मराठी विज्ञान परिषदेने पुण्यामध्ये भरलेल्या वार्षिक अधिवेशनात पुजारी सरांच्या कार्याचा सन्मान त्यांना गौरवपत्र प्रदान करून केला.
Tricks and Tips Tricks and Tips