Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


चिठ्ठी माझ्या मित्राची





‘’आईच पत्र हरवल, तेच मला सापडल’’ हे वाक्य सद्यस्थितीत कानावर पडतच नाही. पूर्वी हा भाषिक खेळ शाळा शाळातून, गल्ली गल्लीतून खेळायचे. परंतू जस जसा वेळ बदलत गेला, तस तश्या पूर्वीच्या संकल्पना बदलत गेल्यात. मोबाईल, इंटरनेट व एकूणच पुरोगामी कालखंडात पत्र पाहायला मिळतच नाही . कारण सर्व कामे ऑनलाईन करण्याची पद्धत रूढ झालेली आहे. आणि म्हणून पूर्वापार चालत आलेले, कालबाह्य होऊ घातलेले खेळ यांचा विसर पडू नये व त्या खेळाचा उपयोग दर्जेदार, प्रभावी व सतर्क अध्यापनासाठी करता येईल का ? हा प्रश्न सतत डोक्यात घोळत होता. एके दिवशी ‘’आईचं पत्र हरवलं, तेच मला सापडलं'’ हा खेळ मुले खेळत असतांनी "माझ्या मित्राची चिठ्ठी" ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या समोर मांडली. आणि म्हणूनच अध्ययन-अध्यापनासाठी आनंददायी वातावरण निर्माण करणे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, अध्ययन-अध्यापानातील निरसता दूर करून नव्याने व उत्साहाने कार्य करणे, स्वयंनिर्मितीला चालना देणे, शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणे, स्वानंदाचा अनुभव घेणे, मुला-मुलीचा एकत्र सहभाग घेणे. या अनुषंगाने "माझ्या मित्राची चिठ्ठी"हा उपक्रम उपयुक्त ठरेल  हा विचार ठाम झाला. हा भाषिक खेळ खेळण्याचे नियम विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केले. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी सहभागी होईल याची खबरदारी घेतली. या भाषिक खेळाची पार्श्वभूमी अशी की सर्वप्रथम या भाषिक खेळांसाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजेच कोरे कागद गोळा करण्यात आले. प्रत्येक A4 कागदाचे 4 भाग करून त्यामध्ये मराठी विषयाच्या संदर्भाने विविध उपक्रम घेता येईल असे नियोजन विद्यार्थांच्या मदतीने करण्यात आले. प्रत्येक कागदावर थोडक्यात शिर्षक लिहिण्यात आले व त्याच्या चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या व त्या बरण्यांमध्ये संग्रहित करण्यात आल्या. त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यात उपयोग, एका शब्दांसाठी अनेक शब्द, शब्द डोंगर, शब्द गाडी, कविता लेखन, गोष्ट लेखन, प्रसंग लेखन, कथा लेखन, पत्र लेखन, व्याकरणातील विविध संकल्पना, एखादा विशिष्ट सुविचार, भाषिक प्रश्नोत्तरे, इत्यादी संग्रहित चिठ्ठया तयार झाल्यात. 
                मराठीच्या तासाला प्रत्येक विद्यार्थी बरण्यातील 1 चिठ्ठी आपल्या मित्राला देत व चिठ्ठीत असलेला मजकूर वाचून त्याचा मित्र त्याप्रमाणे लेखन करत. विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळत होते. त्यामुळे मुले अगदी आनंदाने यामध्ये सहभागी होत होते. याचा फायदा असा झाला की मुले एकमेकांच्या सहकार्याने विविध विषयांवर लेखन करू लागले. विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढली. लेखनाचा सराव होत असल्यामुळे लेखनातील चुका या नगण्य होऊ लागल्या. विद्यार्थ्यांच्या विचारकक्षा वाढल्या. "माझ्या मित्राची चिठ्ठी" याची यशस्वीता लक्ष्यात घेता हा उपक्रम इतरही शाळेत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल, असे माझे ठाम मत आहे.

शब्दांकन : कमलेश तुकारामजी सोनकुसळे 
                काटोल, नागपूर.. 7588691372
                www.kamlesh1029.blogspot.in
Tricks and Tips Tricks and Tips