Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


श्वासोच्छवास

श्वासोच्छवास
श्वासोच्छ्वास बंद झाला म्हणजे माणूस मरतो. श्वास घेणे व तो सोडणे हे कार्य व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अव्याहतपणे चालू असते. श्वास घेतल्याने हवा नाकावाटे फुप्फुसात जाते. तेथे हवेतील प्राणवायू रक्तात मिसळला जातो व रक्तातील कार्बन डायऑक्साइड वायू हवेत सोडला जातो. याखेरीज पाण्याची वाफ, अल्कोहोलसारखे विषारी पदार्थ देखील हवेत टाकले जातात. श्वास सोडल्यावर ही हवा नाकावाटे बाहेर सोडली जाते. श्वास घेताना छातीच्या खाली असलेल्या पडद्यावजा स्नायूने फुप्फुसे खालच्या बाजूला ओढली जातात. तसेच फासळ्यांच्या व मानेच्या स्नायूंमुळे ती बाजूंनी व वरच्या दिशेने ताणली जातात. त्यामुळे आतमध्ये दाब कमी होऊन नाकावाटे हवा फुप्फुसात ओढली जाते. तेथे श्वसनाचे कार्य पूर्ण झाल्यावर पडदा फुफ्फुसांना वर ढकलतो, तर फासळ्यांमधील स्नायू व मानेचे स्नायू फुप्फुसांवर दाब आणतात. त्यामुळे फुप्फुसातील हवा आतील दाब वाढल्याने नाकावाटे बाहेर सोडली जाते. रक्तातील प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड वायूंच्या प्रमाणावर श्वसनाचे नियंत्रण होत असते. मेंदूतील श्वसनाचे केंद्र या क्रियांवर नियंत्रण करते. श्वसनावर काही प्रमाणात ऐच्छिक नियंत्रणही असते. त्यामुळेच आपण स्वतःहून श्वास काही काळ रोखून ठेऊ शकतो; पण कालांतराने स्वयंप्रेरित नियंत्रणाच्या आधारे श्वसन आपोआप चालु होते. पडद्याचे वर खाली होणे जन्माला येण्याच्या क्षणापासून अखेरपर्यंत चालू राहते. सात मिनिटांच्या वर श्वासोच्छ्वास बंद पडल्याने व्यक्ती मरतो.

## संकलित ##
Tricks and Tips Tricks and Tips