सांग मला....
तुझ्या माझ्यातला चांदवा कुठे आहे सांग मला
तुझ्या माझ्यातला गोडवा कुठे आहे सांग मला
हरवुनी भान हे छेडले तराणे अलवार सखे
तुझ्या माझ्यातला मारवा कुठे आहे सांग मला
कळावा बोचरा ढंग पावसाचा पुन्हा तुजला
तुझ्या माझ्यातला गारवा कुठे आहे सांग मला
तुला घेण्या मिठीत अगदी मजेत ऋतू आसुसला
तुझ्या माझ्यातला लाजवा कुठे आहे सांग मला
कुणी वेचून हे शिंपले अता मोती ऐक जरा
तुझ्या माझ्यातला पारवा कुठे आहे सांग मला
© कमलेश सोनकुसळे
काटोल, 7588691372






















.gif)
