Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


26 September 2016

🔹🔹🔹
       प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्याच्या प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समितीचे महत्त्वाचे स्थान आहे. ती निर्णयक्षम आणि तेवढीच सुहृद असणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने पालक, शिक्षक, अधिकारी या सर्व घटकांनी प्रयत्नरत असणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक आणि शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वच टप्यांवरील अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका आहे. ही भूमिका सर्वांना मान्य असली, तरी ती पूर्ण करताना काही ना काही अडचणींना सर्वांनाच सामोरे जावे लागते. शाळा व्यवस्थापन समित्यांचे पुनर्गठण करतानाही बऱ्याचशा अडचणी येत आहेत. या अडचणी प्रामुख्याने मुख्याध्यापकांसमोर आहेत.
          भवतीची सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती लक्षात घेता असे लक्षात येते, की पालकांच्या राजकीय अपेक्षा कमालीच्या उंचावल्या आहेत. काही महत्त्वाकांक्षी आणि संधिसाधू लोक त्यासाठी काहीही करायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना ही राजकीय आखाड्याची पहिली पायरी वाटते. शिक्षक मित्रांच्या केवळ चुका शोधून त्यांचे भांडवल करण्याचा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय लाभांचेही लचके तोडण्याचा प्रयत्न होताना दिसतो. बिचारा मुख्याध्यापक याला बळी पडतो. ही मंडळी आपल्या अल्पशा अपेक्षेसाठी शाळेसारख्या समाजोपयोगी पवित्र मंदिराचाही दुरुपयोग करू पाहतात.
          आता सप्टें. ते डिसें. दरम्यान शा. व्य. समितीच्या मुदती संपणार असून त्यांची पुनर्गठन प्रक्रिया करण्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतील. नवीन समित्या निवडताना मुख्याध्यापकांना अडचणी येणार आहेत. या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी आपण आतापासूनच तयार असले पाहिजे.
या निवडणुका घेताना कोणती काळजी घ्यावी, RTE च्या नियमानुसार कार्यवाही कशी करावी, हे समजून घेणे फारच गरजेचे आहे.
या बाबतीत थोडक्यात माहिती देत आहे.
🔺शाळा व्यवस्थापन समिती🔺
🔹पुनर्गठण/निवडणूक कार्यवाही🔹
🛩मतदार पालकांची यादी तयार करणे.
🛩यादी आक्षेपांसाठी प्रसिद्ध करणे.
🛩आक्षेपांची दखल घेऊन यादीचे पुनरिक्षण करणे.
🛩दुरुस्त यादी शा.व्य.स.च्या सभेत मंजूर करून पुनःप्रकाशित करणे.
🛩निवडणुकीसाठी पालकसभा बोलावणे.
🛩पालकसभेत सदस्यांची निवड पालकांच्या मताने करणे.
🛩स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी ग्रा.पं. मधून रीतसर मागवून घेणे.
🛩शिक्षक प्रतिनिधी निवडून देणे.
🛩निवड झालेल्या सदस्यांतून अध्यक्षाची निवड करणे.
🔺शा. व्य. स. काही निकष🔺
🛩सदस्य संख्या
कमीत कमी १३
जास्तीत जास्त १७
🛩१ शिक्षक प्रतिनिधी
🛩२ विद्यार्थी प्रतिनिधी
१ मुलगा, १ मुलगी
🛩१ गावातील उच्च शिक्षित किंवा शिक्षणप्रेमी किंवा शिक्षणतज्ज्ञ
🛩१ स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी
🛩मु.अ. पदसिद्ध सदस्य सचिव
🛩अध्यक्ष पालकच असावा
🛩५०% महिला आवश्यक
🔹निवडणूक चार प्रकारे घेता येते🔹
🛩आवाजी मतदान
🛩हात उंचवून
🛩चिठ्ठ्या टाकून
🛩प्रतक्ष गुप्त मतदान प्रक्रिया
🔹समिती पुनर्गठण प्राक्रियेत जात संवर्ग निहाय आरक्षण लक्षात घ्यावे🔹
🔺काही महत्त्वाचे मुद्दे🔺
🛩समितीच्या सभा दरमहा घेणे आवश्यक
🛩मु.अ. सदस्य सचिव असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार
🛩विद्यार्थी प्रतिनिधी यांना मतदानाचा अधिकार नाही
🔺सभेत  चर्चेस ठेवण्याचे विषय🔺
🛩वार्षिक सर्वेक्षण
🛩दाखलपात्र विद्यार्थी यादी
🛩वयानुरूप दाखल यादी
🛩वयानुरूप दाखल प्रशिक्षण कार्यक्रम
🛩पोषण आहार माहिती व हिशेब
🛩विद्यार्थ्यांची प्रगती
🛩शाळेचा सर्व शीर्षांचा आर्थिक जमा खर्च अहवाल
🛩विद्यार्थी पटोपस्थिति आणि गैरहजेरी
🛩पालकभेटी
🛩विद्यार्थ्यांना शाळेमार्फत मिळणाऱ्या विविध योजनांची कार्यवाही
🛩शालेय, सहशालेय आणि पूरक उपक्रम नियोजन व कार्यवाही
🛩शाळेच्या अडीअडचणींचे मुद्दे
🛩शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीने येणारे मुद्दे
🛩मु.अ. अधिकारातील सुट्या
🛩भौतिक सुविधा संबंधाने अडीअडचणी
🛩इतर आकस्मिक किंवा स्थानिक सण, उत्सवानिमित्त सुट्या
🛩लोकवर्गणी जमा खर्च
🛩वेळोवेळी प्राप्त होणारे शासन निर्णय आणि त्या संबंधाने करावयाची कार्यवाही
🛩इ. आणि परिस्थितीप्राप्त मुद्दे
🔺साभार
      ✍🏻कमलेश सोनकुसळे, मु.अ.
       जि.प.प्रा. शाळा, उमरी
       जि.प. नागपूर
      7588691372
Tricks and Tips Tricks and Tips