Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


10 February 2019

वाघोडा ( खुटांबा ) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

अंजली गजभिये ठरली student of the year award ची मानकरी 

आजी-माजी विद्यार्थ्यांचा गौरव 

पंचायत समिती काटोल मधील वाघोडा ( खुटांबा ) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश धुर्वे यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत सरपंचा रुपाली पिराजी चचाने यांचे प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक गणेश जोगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम, पिरॅमिड, लेझीम संचलन, नाटिका, इत्यादी कार्यक्रम सादर केलेत. यावेळी student of the year ठरलेली इयत्ता ६ वीची विद्यार्थीनी अंजली युवराज गजभिये, सन २०१८ मधील गावातील १० वीच्या परीक्षेत प्राविण्यप्राप्त मंथन विनोद जाधव, १२ वीच्या परीक्षेत अव्वल विद्यार्थीनी दिव्या गोविंद कातलाम यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच रुपाली चचाने व वंदना देवानंद उईके यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व १००१/- रोख देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्षा चंद्रभागा नागोसे, पोलीस पाटील रोशनी मोंढे, उपसरपंच प्रविण शेंडे, सुधाकर चौधरी, संदीप कातलाम, रत्नमाला कोटजावळे, बबिता सलाम, नंदा मोंढे, माधुरी राऊत, धनराज नेहारे, चित्रा आत्राम, वर्षा खोब्रागडे, साधना गजभिये, हिम्मत नाखले, अरविंद श्रीराव, प्रभाकर चौधरी आदींची उपस्थिती होती. 
       प्रास्ताविक गणेश जोगेकर, सुत्रसंचालन दिलीप बेलखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोहर पठाडे, अजय तातोडे, कमलेश सोनकुसळे, गणेश उईके, दीक्षांत वाहने, कोमल आत्राम, हरीश भोंडवे, सुरज वाहने आदींनी परिश्रम घेतले.



















Tricks and Tips Tricks and Tips