Tricks and Tips

मी कमलेश तुकारामजी सोनकुसळे ( विषय शिक्षक ) जि. प. उच्च प्राथमिक शाळा, वाघोडा (खुंटाम्बा) पं. स. काटोल, जि. प. नागपूर आपले सहर्ष स्वागत करतो. 7588691372....

लेक वाचवा-save girl child-बेटी बचाओ


02 January 2018

या सेटिंग करा बंद

आम्‍ही तुम्‍हाला स्‍मार्टफोनमधील अशा सेटिंगबद्दल सांगणार आहेात, ज्‍या तुम्‍ही ऑन ठेवल्‍या असतील तर ताबडतोब त्‍यांना बंद केले पाहिजे. कारण या सेटिंगद्वारे तुमच्‍यावर लक्ष ठेवले जात आहे. इतकेच नव्‍हे तर यामुळे तुमच्‍या फोटोंपासून ते कॉन्‍टॅक्‍ट्सचा डाटाही चोरला जाऊ शकतो. साधारणपणे युझर्सचे अशा सेटिंगवर लक्ष नसते. मात्र या तुम्‍हाला घातक ठरु शकतात.
अॅप इन्‍स्‍टॉल केल्‍यानंतर या सेटिंग ऑन होऊन जातात. जेव्‍हा आपण एखादे अॅप इन्‍स्‍टॉल करतो तेव्‍हा अॅपला कॅमेरा, कॉन्‍टॅक्‍ट्स आणि मायक्रोफोनच्‍याही परमीशन्‍स देऊन टाकतो. खरेतर याची गरज नसते. मात्र यामुळे सेटिंग ऑन होऊन जातात. येथे आम्‍ही तुम्‍हाला सेटिंगला चेक कसे करावे व बंद कसे करावे हे सांगत आहोत.
पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, या सेटिंगला बंद करण्‍याची पद्धत...

Step 1
फोनच्‍या सेटिंगमध्‍ये जाऊन अॅप परमीशन्‍समध्‍ये जा. नंतर कॅमेरावर टॅप करा. एक लिस्‍ट ओपन होईल. यामध्‍ये असे सर्व अॅप असतील ज्‍यांना फोन कॅमेरा अॅक्‍सेस करण्‍याची पनवानगी देण्‍यात आली आहे. ज्‍या अॅप्‍सना कॅमे-याची गरज नाही. त्‍यांना ताबडतोब बंद करा.

Step 2
बॅक जाऊन कॉन्‍टॅक्‍टवर क्लिक करा. येथेही एक अॅपची लिस्‍ट ओपन होईल, ज्‍यांना तुमचे कॉन्‍टॅक्‍ट अॅक्‍सेस करण्‍याची परवानगी देण्‍यात आली आहे. जसे की, बँकिग अॅपला कॉन्‍टॅक्‍टच्‍या अॅक्‍सेसची काहीही गरज नाही. अशांना ताबडतोब ऑफ करा.

Step 3
मायक्रोफोनवर टॅप करुन पुन्‍हा ही प्रोसेस करा. FM Radio, facebook यांना मायक्रोफोनच्‍या अॅक्‍सेसची काहीही आवश्‍यकता नसते, त्‍यांना ऑफ करा.
Tricks and Tips Tricks and Tips